esakal | नाशिकला 59 वर्षांनी केंद्रामध्ये पहिल्यांदा मिळाले मंत्रिपद! उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व
sakal

बोलून बातमी शोधा

bharati pawar

नाशिकला 59 वर्षांनी केंद्रामध्ये पहिल्यांदा मिळाले मंत्रिपद

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला’, अशी उक्ती ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या अनुषंगाने देशाच्या राजकारणात वापरली गेली. दिवंगत चव्हाण यांना १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर नाशिककरांनी बिनविरोध संसदेत पाठवले आणि पंडित नेहरूंनी त्यांना संरक्षणमंत्रिपद दिले. दिवंगत चव्हाण यांनी त्याबदल्यात नाशिककरांना एचएएल कारखाना दिला. त्यानंतर ५९ वर्षांनी पहिल्यांदा दिंडोरीच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या रूपाने केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाले. (Nashik-district-got-ministerial-post-for-first-time-in-59-years-marathi-news)

यापूर्वी डॉ. सुभाष भामरे यांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रिपद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘टीम’मध्ये धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्यानंतर आता डॉ. पवार यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला प्रतिनिधित्व मिळाले आहे. कळवण विधानसभा मतदारसंघातून आठवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेले दिवंगत ए. टी. पवार यांच्या त्या धाकट्या स्नुषा आहेत. डॉ. पवार यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू झाला. दिवंगत पवार यांनी पक्षातून पहिल्यांदा उमराणे (ता. देवळा) जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास सांगितले आणि त्या विजयी झाल्या. पुढे त्यांनी मानूर (ता. कळवण) गटातून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून डॉ. पवार यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्या वेळी त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याचक्षणी त्यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी अंतिम मानली गेली होती. घडले तसे आणि डॉ. पवार यांनी बाजी मारली. त्यांच्या यशामध्ये मागील निवडणुकीतील पराभवाची सहानुभूती मिळाल्याचे मानले गेले होते. पहिल्यादांच खासदार झालेल्या डॉ. पवार यांचे नाव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या सुरवातीला चर्चेला आले. अखेर त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजपचा गड राखला

भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून हरिश्‍चंद्र चव्हाण म्हणजे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असे समीकरण झाले होते. २०१९ मध्ये पक्षाने चव्हाण यांची उमेदवारी कापत डॉ. पवार यांना उमेदवारी दिली. डॉ. पवार यांनी भाजपचा गड राखला. बारामतीइतका सुरक्षित मतदारसंघ असा प्रचार राष्ट्रवादीकडून केला जात होता. मात्र पहिल्यांदा श्री. चव्हाण आणि त्यानंतर डॉ. पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रचारावर पाणी फिरवले. पूर्वीच्या मालेगाव लोकसभा मतदारसंघातून यादव नारायण जाधव, एल. एल. जाधव, झेड. एम. कहांडोळे, जनता दलाचे हरिभाऊ महाले, सीताराम भोये, कचरूभाऊ राऊत, चव्हाण यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले. सुरगाण्याचे महाराज धैर्यशील पवार यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. २००९ मध्ये मालेगाव लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि पूर्वीप्रमाणे हा मतदारसंघ आदिवासी बांधवांसाठी राखीव राहिला.

हेही वाचा: निफाडच्या राजकारणाला कलाटणी! यतीन कदमांचा भाजपमध्ये प्रवेश

हेही वाचा: जिल्हा परिषद सदस्या ते केंद्रीय मंत्री; भारती पवार यांचा प्रवास

loading image