esakal | निफाडच्या राजकारणाला कलाटणी! विधानसभा निवडणुकीत कदमांची उमेदवारी निश्‍चित?
sakal

बोलून बातमी शोधा

yatin kadam

निफाडच्या राजकारणाला कलाटणी! यतीन कदमांचा भाजपमध्ये प्रवेश

sakal_logo
By
उत्तम गोसावी

ओझर (जि.नाशिक) : येथील युवा नेते व निफाड तालुक्याच्या राजकारणातील एक प्रमुख नेते यतीन रावसाहेब कदम यांनी अखेर बुधवारी (ता. ७) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश केला. यतीन कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे निफाडच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीत यतीन कदम हेच भाजपचे उमेदवार असतील, असे संकेत सुद्धा मिळाले आहेत. (Yatin-Kadam-joins-BJP-nashik-marathi-news)

आगामी विधानसभा निवडणुकीत यतीन कदम भाजपचे उमेदवार?

यतीन कदम यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत निफाडमधून भाजपची उमेदवारी दिली असती तर कदाचित आज ते विधानसभेत दिसले असते, असे सूचक उद्‌गार देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याने पुढील निवडणुकीत कदम यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. विशेष म्हणजे यतीन कदम यांचे वडील दिवंगत रावसाहेब कदम हे शिवसेनेचे आमदार होते. तर, मातोश्री मंदाकिनी कदम यासुद्धा साडेसात वर्षे शिवसेनेच्या आमदार होत्या. आई - वडील दोघेही आमदार असल्याचे भाग्य यतीन कदम यांना लाभले. आता ते स्वतः आमदार होतात का, याकडे नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र पाय दुखण्याच्या व्याधींमध्ये वाढ

हेही वाचा: नाशिककरांचे स्वप्न आजपासून प्रत्यक्षात! शहर बस वाहतूक सेवा सुरू

loading image