नाशिक- राज्यात काही भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. आपत्तीपूर्व आणि आपत्ती काळातील कार्यवाहीसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला असून, संपूर्ण आपत्ती प्रतिसाद यंत्रणा अद्ययावत ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी दिली.