आनंदवार्ता! नाशिक पॅर्टनचा देशात बोलबाला...जिल्हा लवकरच होणार कोरोनामुक्त होण्याचे संकेत

coronavirus.jpg
coronavirus.jpg
Updated on

नाशिक : राज्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण झपाट्याने वाढल्याने "हॉटस्पॉट' ठरले आहे. असे असले तरी आरोग्य यंत्रणेने घेतलेल्या असाधारण मेहनतीमुळे राज्यातच नव्हे, तर देशभरात सर्वाधिक कोरोनामुक्त करण्यात आलेल्या रुग्णांच्या प्रमाणात नाशिक अव्वल ठरले आहे. 

 जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी सुखावणारी बाब

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात नागरिकांसह पोलिस, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूने विळख्यात घेतल्याने राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष वेधले गेले. अत्यंत झपाट्याने मालेगावात कोरोनाबाधितांचा आकड वाढत गेला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एकदा नव्हे दोनदा येत आढावा घेतला. दुसरीकडे आरोग्य यंत्रणाही सक्षमतेने रुग्णसेवेसाठी झटली. परिणामी, पावणेदोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 775 झाला. तर अवघ्या आठवडाभरात कोरोनामुक्त रुग्णांचा आकडाही 534 झाला. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांचे 68.90 टक्के प्रमाण हे राज्यातीलच नव्हे, तर देशात अव्वलस्थानी आहे, ही बाब जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी सुखावणारी आहे. 

775 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 534 रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यातील 775 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी शुक्रवारी (ता. 15) सायंकाळपर्यंत 534 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे होणार मृत्युदर 4.29 टक्के आहे. देशभरात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 33.64 टक्के आहे. तर दिल्लीत 35 टक्के, गुजरातमध्ये 38.43 टक्के, तमिळनाडूत 23.58 टक्के, तेलंगणात 68.69 टक्के, केरळमध्ये 91.76 टक्के, पंजाबमध्ये 10.39 टक्के, तर महाराष्ट्रात 22.63 टक्के आहे. 

कोरोनामुक्तीचे प्रमाण टक्केवारी 

मालेगाव : 71.10 
नाशिक शहर : 71.11 
नाशिक ग्रामीण : 51.02 
एकूण जिल्हा : 68.90 
कोरोनामुळे मृत्यू : 4.26 

देशभरातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण पाहता, यात सर्वाधिक रिकव्हरी रेट नाशिक जिल्ह्याचा सर्वाधिक आहे. आरोग्य विभागाचे डॉक्‍टर्स, कर्मचाऱ्यांनी यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. येत्या काही दिवसांत हे प्रमाण वाढवून जिल्हा कोरोनामुक्त होताना दिसेल. - डॉ. अनंत पवार, नोडल ऑफिसर, कोरोना कक्ष, नाशिक जिल्हा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

tribal youth protest outside commissionerate Nashik
Shalarth ID Scam
School Education Minister Dadaji Bhuse during the meeting on the pending Satana–Mangrul National Highway project.
Nashik Earthquake
Marathi News Esakal
www.esakal.com