
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य शासन महिलांना आर्थिक पाठबळ देत आहे. जिल्ह्यात योजनेचे साधारण सात लाख २० हजार ८४४ अर्ज मंजूर झाले आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. १७) येथे सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील राज्यस्तरीय प्रारंभाबरोबरच जिल्हास्तरावरही शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात कार्यक्रम झाला. (Nashik district second in state in Majhi Ladki Bahin Yojana )