नाशिक- इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांकडून जल्लोष सुरू आहे. नाशिक विभागाच्या निकालाचे विश्लेषण केले असता विज्ञान शाखेतील मुलेच हुशार असल्याचे चित्र समोर येते..भौतिकशास्त्राचा निकाल ९८.९९, रसायनशास्त्र ९९.४५ आणि जीवशास्त्राचा ९९.४९ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत कठीण समजल्या जाणाऱ्या बुक कीपिंग ॲन्ड अकाउंटन्सीचा निकाल ९६.१८ टक्के लागला. तिन्ही शाखांत असलेला इंग्रजीचा निकाल सर्वांत कमी ९१.१८ टक्के लागला आहे..यंदा नाशिक विभागाच्या निकालात तीन टक्क्यांहून अधिकची घसरण नोंदविली आहे. निकाल घसरला असला, तरी विषयनिहाय निकालाचा आढावा घेतल्यास कठीण विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी केल्याचे समोर येते. विशेषतः विज्ञान शाखेशी निगडित विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विज्ञान शाखेतील अवघड विषयांपैकी आणखी एक असलेल्या गणित विषयाचा नाशिक विभागाचा निकाल ९९.०७ टक्के लागला. या विषयातील ७६ हजार ७६८ पैकी ७६ हजार ०५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले..Emergency Alerts : भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! धोकादायक परिस्थितीत तुमच्या मोबाईलवर मिळणार अलर्ट, पटकन सुरू करून घ्या ही 1 सेटिंग.भौतिकशास्त्र विषयात ९० हजार ३५९ पैकी ८९ हजार ४४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, टक्केवारी ९८.९९ इतकी आहे. रसायनशास्त्रात ९० हजार ३३२ पैकी ८९ हजार ८२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जीवशास्त्रात ७७ हजार ३०६ पैकी ७६ हजार ९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत..मायमराठीत ९५.३७ टक्के उत्तीर्णमराठी विषयात एक लाख १८ हजार ३२६ पैकी एक लाख १२ हजार ८४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ९५.३७ टक्के आहे. इंग्रजी विषयाचा निकाल नीचांकी लागला असून, एक लाख ६६ हजार २१८ पैकी एक लाख ५१ हजार ५६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हिंदीत ३२ हजार १६६ पैकी ३० हजार २९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ९४.१७ टक्के आहे. इतिहास ९५.९६ टक्के, भूगोल ९५.५०, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स (ओसी) ९८.०६, सिक्रेटियल प्रॅक्टिस (एसपी) ९७.५७ टक्के निकाल लागला. एकूण १२३ विषयांचा समावेश परीक्षेत केलेला होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.