उपनगर: पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि हरित पट्टा वाढविण्यासाठी शासनाने ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राज्यात दहा कोटी वृक्षलागवडीचे भव्य उद्दिष्ट निश्चित केले आहे. या अंतर्गत सध्या झाडांची लागवड प्रक्रिया वेगात सुरू असून, शासनाच्या २३ विभागांना ठराविक उद्दिष्ट देऊन कार्यवाहीस गती देण्यात आली. याचा प्रभाव नाशिक विभागात दिसून येत असून, येथे आतापर्यंत दोन लाख ६६ हजार ३५८ वृक्षांची यशस्वी लागवड झाली आहे.