जुने नाशिक- वडाळा रोड परिसरात असलेल्या रुग्णालयाचे संचालक डॉ. देवेंद्र खैरनार यांच्याकडे रुग्णालय सुरू ठेवण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी संशयित अंजुम मकरानी यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे न दिल्यास हॉस्पिटल बंद पाडण्यासह जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.