Nashik News : येवल्यात डॉक्टरांनी जगवली हजारांवर वृक्ष! 30 टक्केच वृक्ष शिल्लक असल्याने वृक्ष चळवळ उभी करण्याचे आवाहन

Nashik : येथील डॉक्टर असोसिएशनकडून एक लाख वृक्ष लागवड उपक्रमाच्या अंतर्गत येथील गोशाळा मैदानावर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
The trees planted by the doctors' association here years ago have flourished even in drought today.
The trees planted by the doctors' association here years ago have flourished even in drought today.esakal

Nashik News : येथील डॉक्टर असोसिएशनकडून एक लाख वृक्ष लागवड उपक्रमाच्या अंतर्गत येथील गोशाळा मैदानावर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वर्षानंतर भर उन्हाळ्यातही सर्वत्र भकास दिसत असताना या झाडांनी बाळसे धरले असून हजारावर वृक्ष वाढून टवटवीत झाले आहेत. यामुळे डॉक्टरांच्या पर्यावरणपूरक सामाजिक बांधिलकीचे स्वागत होत आहे. तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय व सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे. ()

येथील गोशाळा मैदानाच्या आजूबाजूला सर्वाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वडाच्या वृक्षाची ज्येष्ठ डॉक्टरांच्या हस्ते लागवड केली. तसेच तालुक्यातील शहरी भागात व ग्रामीण भागात जेथे जागा मिळेल तिथे अनेक प्रकारचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. यानिमित्ताने देशी झाडे व बीज लागवड करून देखभालीची प्रतिज्ञा केली.

गेल्या वर्षी डॉ. क्षत्रिय यांच्या पुढाकाराने डॉक्टर असोसिएशनचे निसर्गप्रेमी डॉ. राम खोकले, वनस्पती अभ्यासक डॉ. अविनाश विंचू व गडकोट तसेच पर्यावरण अभ्यासक डॉ. अलंकार गायके यांनी काबरा ट्रस्टचे अध्यक्ष, समाजसेवक पुरुषोत्तम काबरा यांचे सहकार्य घेऊन गोशाळा मैदानात जागा उपलब्ध करत या ठिकाणी ही वृक्ष लागवड केली होती.

गोशाळा, पांजर पोळ जागेत आतापर्यंत १९० प्रकारचे झाडेवेली, १०० वडाचे वडवन गेल्या वर्षी लागवड केली. त्याशेजारी नियोजित कृष्णवड, कबीरवड, भुरळी वड, रामवड, ब्रम्हवड, कृष्ण उंबर, ढेड उंबर, खडक पायर असे वडवर्गीय वृक्ष वन व कदंब वन यासाठी जागा सपाटीकरण झालेले आहे. फक्त पाण्याअभावी लागवड थांबली आहे. येथील ७० ते ८० डॉक्टर्स मिळून हजारो झाडांचे लागवड व बीजारोपण झाले आहे.  (latest marathi news)

The trees planted by the doctors' association here years ago have flourished even in drought today.
Nashik NMC News : बेकायदा होर्डिंग्ज ताब्यात घेण्याची कारवाई सुरू

आतापर्यंत हजारवर झाडांचे संगोपन झाल्याने भर दुष्काळात ही झाडे टवटवीत होऊन फुलली आहेत. असोसिएशनच्या या उपक्रमाला येवलेकरांनी सहकार्य केल्यास १ कोटी वृक्षलागवड सहज शक्य असून तेवढी जागाही उपलब्ध असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. क्षत्रिय यांनी म्हटले आहे.

शहर करावे लागेल कूल

सिमेंटच्या जंगलात तापमान वाढत असल्याने देशी व स्थानिक वृक्षारोपणाची गरज निर्माण झाली आहे. सावलीच्या शोधात फिरण्याची वेळ येत असून येवल्यात ३० टक्केच वृक्ष शिल्लक आहेत. त्यात अनवधान व अज्ञानामुळे निरुपयोगी स्प्याथोदिया, गुलमोहर, पितमोहर, काशीद या विदेशी वृक्षांची संख्याच जास्त असल्याने बियोडिव्हर्सिटी धोक्यात आहे.

सध्या शहरातील तापमान ३९ अंशावर पोचले असून उष्णतेत प्रचंड वाढ होऊन झाडांची निकड भासू लागली आहे. तसेच उष्माघाताचा त्रास आबालवृद्धांना जाचक होऊन जीवघेणा ठरू नये यासाठी आतापासूनच एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करण्याचे नियोजनही काळाची गरज असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. क्षत्रिय यांनी व्यक्त केले.

शवदाहिनी अभावी स्मशानभूमीत लाकडे वापरावी लागतात तसेच पाइपलाइन, रस्ते, बंगले आदी कामांसह अंधश्रद्धा म्हणून पिंपळ, उंबर यासारखी झाडे तोडली जाणे हे घातक आहे. शरीराचा विचार करून नागरिकांनी असोसिएशनच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. क्षत्रिय, डॉ. विंचू, डॉ. गायके, डॉ. खोकले आदींनी केले आहे.

The trees planted by the doctors' association here years ago have flourished even in drought today.
Nashik News : ‘मॉडेल रोड’साठी 2025 पर्यंत एकेरी वाहतूक! सीबीएस ते कॅनडा कॉर्नर वाहतूक मार्गात बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com