नाशिक: कॉलेज रोडकडून सिद्धार्थनगर रस्त्याने सिबल हॉटेलकडून त्र्यंबक रोडकडे जाणाऱ्या एका धावत्या कारच्या काचेवर अज्ञात संशयितांनी दगड मारला. कार थांबताच अज्ञात संशयितांनी कारचालक असलेल्या डॉक्टरला मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड, गळ्यातील सोन्याची चैन व मोबाईल हिसकावून नेल्याचा प्रकार रविवारी (ता.३) रात्री घडला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात सोमवारी (ता.४) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.