
नाशिक : श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील पाचपैकी चार दानपेट्या उघडण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांपासून दानपेट्यांमधील पैशाची मोजणी सुरू होती. त्यात पाचपैकी चार दानपेट्यांमधून अकरा लाख आठ हजार पाचशे एक्केचाळीस रुपये प्राप्त झाले. मात्र, यादरम्यान दुपारी दोनला मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील हनुमान मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने लांबविल्याने खळबळ उडाली आहे.