Nashik News : थकबाकीमुळे 16 गाव पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित; उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल

Nashik : वीज वितरण कंपनीने लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचा थकबाकीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला आहे.
Water Treatment Plant.
Water Treatment Plant.esakal

Nashik News : वीज वितरण कंपनीने लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेचा थकबाकीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला आहे. लासलगावकरांना सहा ते सात दिवसांपासून पाणी नाही. थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत करणार नसल्याचे वीज वितरण कंपनीने सांगितले आहे. त्यामुळे पाणीप्रश्न सुटण्यासाठी किती दिवस वाट बघावी लागेल, हा लासलगावकरांना प्रश्न पडला आहे. (Nashik Due to arrears of electricity supply to 16 village water schemes has been interrupted marathi news)

लासलगावच्या महिलांच्या डोक्यावर हांडे दिसू लागले आहेत. खासगी टँकरचालकांना यानिमित्त ‘अच्छे दिन’ आले आहेत. येणाऱ्या काळात लासलगावकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लावू शकते. यात प्रशासन गांभीर्याने लक्ष घालून पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. सरपंच निवड न्यायप्रविष्ठ आहे.

निवडून दिलेले सर्व सदस्यांना पाणीप्रश्नाचा विसर पडला असून, गावाला ‘राम भरोसे’ सोडल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, लासलगावमध्ये सरपंचविना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तीन महिन्यापासून पगार नसल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्याने स्वच्छता, पाणीपुरवठा, व दिवाबत्तीचा प्रश्न गंभीर झाला होता. निफाडचे गटविकास अधिकारी पाटील व ग्रामसेवक जंगम यांनी आठ दिवसांत कर्मचाऱ्यांचे पगार होतील, असे आश्वासन दिल्यावर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.(latest marathi news)

Water Treatment Plant.
Nashik News : देवळाली कॅन्टोन्मेंट ठरणार ‘नाकापेक्षा मोती’ जड; समावेशाने महापालिकेचे अर्थकारण बिघडणार

''लासलगावला सहा ते सात दिवसांपासून पाणी नाही. त्यात पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने आम्हाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीप्रश्न जणू आमच्या पाचवीला पुजलेला आहे की काय, असे वाटू लागले आहे.''-कावेरी पालवे, त्रस्त महिला

''लासलगावचा पाणीप्रश्न कोणकोणत्या कारणांनी चर्चेत असतो. वीजपुरवठा खंडित झाल्याने पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालून पाणीपुरवठा सुरळीत होतील, यासाठी प्रयत्न करावेत.''-गणेश जोशी, सामाजिक कार्यकर्ते.

''लासलकरांना काही दिवसापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याच काळात वीज पुरवठा खंडित झाल्याने पाण्यासाठी वन वन करावी लागत आहे पण लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्यात आपण वरिष्ठांना भेटणार आहोत. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.''-लिंगराज जंगम, ग्रामसेवक, लासलगाव

Water Treatment Plant.
Nashik News : नवभारत साक्षरता परीक्षेला 70 टक्के उपस्थिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com