Nashik News: बंदमुळे बाजार समिती आवारात शुकशुकाट! शासनाच्या कायद्याविरोधात एकदिवसीय लाक्षणिक संप

Nashik News : सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजार तळ, उपबाजार तळ निर्माण करणे, तसेच अडते, हमाल-मापाडी आदी घटकांविरोधात राज्य शासनाने निर्णय घेतला आहे
Due to the one-day closure of the market committees, the Shukshukat in the main premises of the Agricultural Income Market Committee on Monday
Due to the one-day closure of the market committees, the Shukshukat in the main premises of the Agricultural Income Market Committee on Mondayesakal

पंचवटी : सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजार तळ, उपबाजार तळ निर्माण करणे, तसेच अडते, हमाल-मापाडी आदी घटकांविरोधात राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाने राज्यातील बाजार समित्या बंद पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे हमाल-मापाडी, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असा आरोप करत या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सोमवारी (ता.२६) बंद पुकारला होता.

यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीही सहभागी झाली, त्यामुळे दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवार व शरदचंद्रजी मार्केट यार्डमध्ये संपूर्ण शुकशुकाट दिसून आला. मात्र काही किरकोळ विक्रीसाठी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर शेतमाल विक्री केली. (Nashik close market committeeone day symbolic strike marathi news)

राज्य सरकारने कृषी व पणन कायद्यात बदल केले आहेत. या बदलामुळे शेतकऱ्यांचे, हमाल व मापारी यांचे नुकसान होणार आहे. याविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघाने बैठक घेऊन सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ च्या विधेयक क्रमांक ६४ अन्वये बदल करू नये, अशी मागणी बाजार समितीच्या प्रतिनिधींनी केली.

राज्याच्या पणन संचालनालयाने पणन कायद्यात दुरुस्त्यांसंबंधी २३ फेब्रुवारीपर्यंत सूचना, हरकती मागविलेल्या आहेत. बैठकीत चर्चा होऊन कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये प्रस्तावित बदल होऊ नये. तसेच २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये सुरू असलेले बदल करू नयेत, अशी मागणी बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी करीत शासनाचे त्याकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय बंद पुकारला होता.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने या संपात सक्रिय सहभाग नोंदविला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवार व शरदचंद्रजी मार्केट यार्ड पूर्णतः बंद होता. यामुळे काही किरकोळ पालेभाज्या व फळभाज्या विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी मुख्य बाजार आवाराच्या व शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डासमोर माल विक्री करून घरी परतले. (Latest Marathi News)

Due to the one-day closure of the market committees, the Shukshukat in the main premises of the Agricultural Income Market Committee on Monday
Nashik News: गोदाच्या उजव्या तीरावर 8 किलोमीटर मलवाहिका! ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत पर्यटनस्थळांचा विकास

कोट्यवधीची उलाढाल ठप्प

राज्य बाजार समिती सहकारी संघाने पुकारलेल्या बंदमध्ये नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीनेही सहभाग नोंदविल्याने बाजार समितीत दररोज होणारी ६-७ कोटींची उलाढाल ठप्प झाली. तसेच बाजार समितीला सुमारे ५ ते ६ लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

बाजारात, रस्त्यावर दुकान व गाडा लावून हात विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची या बंदमुळे चांगलीच धावपळ उडाली. दररोज विक्रीसाठी लागणारा हवा तसा व हव्या त्या प्रमाणात माल उपलब्ध नसल्याने माल खरेदीसाठी पायपीट करावी लागली. तसेच शेतकरी देईल त्या भावात माल खरेदी करावा लागला. दरम्यान रात्री दहा वाजेनंतर बाजार समिती पुन्हा पूर्ववत झाल्याने रात्रीची खरेदी-विक्री सुरू राहील.

Due to the one-day closure of the market committees, the Shukshukat in the main premises of the Agricultural Income Market Committee on Monday
Nashik: सीता कुंडाचे पौराणिक महत्त्व लयास जाण्याच्या मार्गावर! सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासाची अपेक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com