

Nashik News : दडी मारलेल्या पावसाने सोमवारी (ता.१९) जोरदार हजेरी लावली. अचानक कोसळलेल्या पावसाच्या पाण्याने स्मार्टसिटीच्या कामाचं पितळ उघडं पडले आहे. स्मार्टसिटीने गोदावरी नदीत गटारीचे पाणी जाऊ नये यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. अर्ध्या पाऊण तासाच्या मध्यम स्वरूपाच्या पावसात गटारी ओव्हर फ्लो होऊन गोदापात्रात मिसळत आहे. भुयारी गटाराची क्षमता वाढविण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च झाले. (Due to heavy rains sewage water in Godavari is burden of smart city work )