Nashik News : पाण्याअभावी उभ्या कांद्यात सोडली जनावरे; बागलाण तालुक्यातील स्थिती

Nashik : पिंपळदर (ता. बागलाण) गाव परिसरात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शिवारातील पाण्याचे स्रोत विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटू लागली आहे.
Amber Pawar here left the cattle in the onion crop due to lack of water.
Amber Pawar here left the cattle in the onion crop due to lack of water.esakal

Nashik News : पिंपळदर (ता. बागलाण) गाव परिसरात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शिवारातील पाण्याचे स्रोत विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटू लागली आहे. पिकांना पुढील पाणी देणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांवर लागवड केलेली पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. (Nashik animals were left in onion farm in baglan marathi news)

गाव शिवारातील अनेक विहीरी कोरड्याठाक झाल्याने शेतकऱ्यांना दोन ते अडीच महिन्याच्या कांद्याच्या पिकात मेंढ्या व गुरे सोडल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. यंदा तिळवण, निरपूर, खमताणे, पिंपळदर या भागात डोंगररांगाना लागून क्षेत्रात पर्जन्यांचे प्रमाण कमी राहिल्याने या भागातील छोटे मोठे धरण, नाला बांध पावसाळ्यात देखील कोरडे राहिले.

त्यामुळे या भागातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी पुरेल या आशेवर कांद्याची लागवड केली होती. मात्र सध्या पाण्याची पातळी वेगाने खालावल्याने अनेक शेतकऱ्यांनी दोन ते अडीच महिन्यांच्या कांदा पिकांमध्ये जनावरे सोडून दिली आहेत.

Amber Pawar here left the cattle in the onion crop due to lack of water.
Nashik News : पंचवटीतील मनपाचे गाळे वापराविना धूळखात महापालिकेच्या उद्देशाला हरताळ

पिंपळदर येथील शेतकरी अंबर रामा पवार यांनी आपला दोन ते अडीच एकर कांदा पिकात मेंढ्या सोडून दिल्या आहेत. नवीन कूपनलिका केल्या तरी पाणी लागणार नाही म्हणून पीकच सोडणे फायद्याचे ठरेल म्हणून पिकात मेंढ्या घातल्याचे त्यांनी सांगितले. जनावरांना पिण्यासाठी देखील टॅंकरणे विकतचे पाणी आणावे लागणार असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

पाण्याची कमतरता असल्यामुळे लागवड केलेला कांदा कमी पाण्यावर घेता यावा, यासाठी ठिबक सिंचन, रेन पाइप, तुषार सिंचन, स्प्रिंकलर अशा महागड्या साधनांचा वापर करत मोठ्या प्रमाणात खर्च केला. पण फेब्रुवारीतच विहिरींचे पाणी पूर्णतः आटून त्या कोरड्याठाक झाल्याने लागवड केलेली दोन महिन्याची पिके होरपळली आहेत. त्यात जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.

''माझ्या शेतात चार विहिरी असून आज त्या सर्व कोरड्याठाक झाल्याने पाण्याअभावी कांदा वाळू लागला आहे, त्यामुळे नाईलाजाने त्यात गुरे सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. प्रचंड आर्थिक नुकसान होऊन कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढत असल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.''- अंबर रामा पवार, कांदा उत्पादक, पिंपळदर. (latest marathi news)

Amber Pawar here left the cattle in the onion crop due to lack of water.
Nashik News : ‘जातेगाव’ आरोग्य केंद्राला ‘कायाकल्प’ पुरस्कार; जिल्ह्यातील 32 आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com