Wedding Ceremony Business : नव्या ट्रेंडमुळे ग्रामीण भागात लग्नकाऱ्यात ‘इव्हेंट’वर भर! युवकांना मिळाला रोजगार

Wedding Season : लग्नसराई बदलत्या काळानुसार हायटेक झाली असून, लग्नसराईचे स्वरूपही पूर्णपणे बदलले आहे.
Wedding Ceremony
Wedding Ceremonyesakal

पिंपळगाव बसवंत : लग्नसराई बदलत्या काळानुसार हायटेक झाली असून, लग्नसराईचे स्वरूपही पूर्णपणे बदलले आहे. शहरी भागात असणारा हायटेक ट्रेड आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुजू होण्यास सुरवात झाली आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून शहरात होणारी लग्नकार्ये आता ग्रामीण भागातही इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून होत आहेत. या बदलत्या लग्नसराईत युवकांना मोठा रोजगार मिळाला आहे. (nashik Due to new trend focus on event in wedding ceremony in rural areas Youth got employment marathi news)

मोबाइल व इंटरनेटच्या युगात फोटो व व्हिडिओला मोठी मागणी असत्यामुळे सण-उत्सव, उद्‌घाटन यांचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. यातून लग्नसराईचे बजेट वाढले, तरी रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.

फेट्यांना मागणी

लग्नसराईत फेट्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आली आहे. फेटे बांधणे ही एक कला असून, त्यासाठी ग्रामीण भागातील युवक मोठ्या शहरात प्रशिक्षण घेऊन स्वतः विविध रंगांचे फेटे आणून त्याचे पॅकेजेस व प्रमोशन करीत आहेत.

शाळांचे स्नेहसंमेलन

ग्रामीण भागातील अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांची स्नेहसंमेलने मोठ्या थाटात होतात. यात इव्हेंट मॅनेजमेंटचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. पेपर ब्लास्ट, हायटेक एलईडी लायटिंग, फिरते स्टेज, आतषबाजी यांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

लग्नसराई पूर्णपणे सिनेस्टाइल

एरवी लग्नांमध्ये घोड्यावरून येणारा नवरदेव याची जागा आता पारंपरिक घोडा बग्गीने घेतली आहे. एलिफंट एंट्री, क्राउन एंट्री, फॉग मटकी, नवरीची स्पेशल डोली, नुसते स्वागतासाठीच दहा हजार रुपयांपासून लाखो रुपयांपर्यंत पॅकेजेस आहेत.

फुग्यांचे डेकोरेशन

एरवी फक्त वाढदिवसाच्या दिवशी दोन-चार लागणाऱ्या फुग्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. विविध आकारांची, विविध रंगांची फुगे आता खेळण्याची नाही, तर सजावटीची साधने झाली आहेत. छोट्या-मोठ्या दुकानांची उद्‌घाटने, वाढदिवस, नामकरण सोहळा, मुंज व डोहाळे या कार्यक्रमांसाठी डेकोरेशनचे पॅकेजेस असून, हेलिअम बलून एंट्री, साखरपुडा बलून एंट्री, वेलकम बेबी, असे विविध नवीन डेकोरेशन बाजारात उपलब्ध आहेत. (Latest Marathi News)

Wedding Ceremony
Expensive Wedding Story : कोणी सोन्याची बिस्कीटे वाटली, तर कोणी स्क्रीनची पत्रिका, ही आहेत भारतातली महागडी अन् चर्चेतली लग्न!

मुलींना मिळाला नवीन रोजगार

अनेक प्रतिष्ठानच्या उद्‌घाटनासाठी, तसेच लग्न समारंभात पारंपरिक नऊवारी साडीत युवती वऱ्हाडींच्या स्वागतासाठी असतात. या स्वागताच्या ट्रेंडमुळे युवतींना रोजगार उपलब्ध झाला आहे.

"इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे नुसते डेकोरेशन नसून, टाइम मॅनेजमेंट व टीम मॅनेजमेंटचा योग्य ताळमेळ साधून परिपूर्ण विवाहाचे नियोजन करणे होय. मोठ्या शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही आता इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून लग्न समारंभ होत आहेत."

-मनोज पाटील, संचालक, मुहूर्तम इव्हेंट्स

"फोटोग्राफीपेक्षा सध्या डिजिटल व्हिडिओग्राफीला जास्त मागणी असून, चांगल्या दर्जाचे फोटो व व्हिडिओग्राफी केल्यास ग्राहकही कलेची कदर करून योग्य मोबदला देतात. ग्राहक सोशल मीडियामुळे सॉफ्टकॉपी व रील्स घेणे जास्त पसंत करीत आहेत."

-विलास हांडगे, फोटोग्राफर

Wedding Ceremony
Anant -Radhika Pre Wedding : 'दोन तीन नव्हे पाचपट पैसे दिले तरी लग्नात गाणं म्हणणार नाही'! लता दीदींची होती ठाम भूमिका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com