Wedding Season : लग्न सराईमुळे फुलबाजार तेजीत! गेल्यावर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी दरवाढ

Nashik News : गेल्या वर्षीच्या तुलनेने १५ ते २० टक्क्यांनी किंमती वाढल्या आहेत. लग्नामध्ये वधू-वरांसाठी जिप्स गुलाब या हाराला सर्वाधिक पसंती दिली जात आहे
A vendor prepares flower garlands at a shop in Mosam Chowk, Malegaon.
A vendor prepares flower garlands at a shop in Mosam Chowk, Malegaon. esakal

मालेगाव : कसमादेसह जिल्ह्यात लग्न सराईची धूम सुरु आहे. ६ मे ते १२ जून या कालावधीत अस्त असल्याने लग्न सोहळे नाहीत. परिणामी, एप्रिल अखेरीस व मे महिन्यातील ५ तारखेपर्यंत लग्नसमारंभांची धूम असेल. कडाक्याचे ऊन अंगावर झेलत वऱ्हाडी लग्नसमारंभांना हजेरी लावत आहेत.

लग्नसराईमुळे येथील फुलबाजार तेजीत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे फुलांच्या उत्पन्नातही घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने १५ ते २० टक्क्यांनी किंमती वाढल्या आहेत. लग्नामध्ये वधू-वरांसाठी जिप्स गुलाब या हाराला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. (Nashik Due to wedding season flower market booming news)

३ एप्रिलपासून लग्न सोहळ्यांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. तसेच, एप्रिल महिन्यातच महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती या काळात झेंडू व इतर फुलांना मोठी मागणी वाढली होती. झेंडुची फुले बाजारात १०० ते १५० रुपये किलोने विक्री होत आहेत. लग्नसराई, जयंती, उत्सवामुळे फुलांच्या मागणीत दुप्पटीने वाढ झाली आहे.

परिणामी, फुलांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लग्नसराईमध्ये मोगरा, शेवंती, निशीगंध, निली, गुलाब, जरगीरा फुलांना मागणी आहे. हार बनवितांना या फुलांचा वापर केला जातो. हारमध्ये निळी, सफारी, बंगाली गुलाब पाकळी, जिप्स गुलाब यांना मोठी मागणी आहे. गुलाब फूल शिर्डी, नाशिक येथून येतात. गजरा व मोगरा नांदेड तर झेंडुची फुले नाशिक येथून येतात. नाशिक येथे मुंबईहून गुलाब पाकळीचा माल येतो.

शहरात मोसम पूल, कॅम्प, सटाणा नाका, महात्मा फुले रस्ता यांसह विविध ठिकाणी तीसपेक्षा अधिक फुल विक्रीची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये फुले खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. येथील फुलहार तयार करणाऱ्या दुकानदारांकडे महिनाभरापुर्वीच लग्नसोहळ्यासाठी लागणारे वधु-वरांचे हार तयार करण्यासाठीची बुकींग झाली आहे. (Latest Marathi News)

A vendor prepares flower garlands at a shop in Mosam Chowk, Malegaon.
Wedding Season Business: लग्नसराईमुळे खासगी वाहनचालकांना सुगीचे दिवस! देवदर्शनासाठी विविध वाहनांना दिले जाते पसंती

एप्रिल महिन्यात फुलांची प्रचंड प्रमाणात विक्री झाली. हळदी व मेहंदीचा साज तयार करण्यासाठी जिप्सी गुलाबचा ट्रेंड बघायला मिळाला. फुलांमध्ये कलर गुलाब ४०० ते ५०० रुपयांला २० फुले मिळत आहेत. सर्वात महाग कलर गुलाब फुलाची विक्री होते. नवरदेवच्या गाडी सजविण्यासाठी गुलाब फुलांचा वापर होतांना दिसत आहे.

"यावर्षी मोठ्या प्रमाणात लग्नसराई असल्याने फुलांची विक्री वाढली. त्यामुळे दुकानांमध्ये गर्दी होती. कलर गुलाबला सर्वाधिक पसंती दिली जात होती. हारमध्ये जिप्स हारला मागणी होती. मे महिन्यातील अस्तामुळे लग्नसोहळ्याचा हंगाम यावर्षी महिन्याने कमी झाला."

- दादा बहिरम, फुलविक्रेता, मालेगाव

हाराचे दर

सफारी - १ हजार ते २ हजार रुपये

गुलाबपाकळी - २ हजार ते ४ हजार

जिप्स गुलाब - ३ ते ५ हजार

गजरे - २०० ते ३०० रुपये डझन

गुलाबाची फुले - १०० रुपये डझन

A vendor prepares flower garlands at a shop in Mosam Chowk, Malegaon.
Men Wedding Wear : लग्नामध्ये पारंपारिक पोशाख परिधान करण्याकडे पुरूषांचा वाढतोय कल, शेरवानीला मिळतेय सर्वाधिक पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com