traffic diversion
sakal
नाशिक: दसऱ्यानिमित्त गुरुवारी (ता. २) चतुःसंप्रदाय आखाडा महंत कृष्णचरणदास महाराज यांच्यातर्फे रावण दहन आयोजित करण्यात येते. रावण दहनापूर्वी श्रीराम-लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघते. त्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. तरी भाविकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.