Electricity Supply
sakal
नाशिक: शहराचा वाढता विस्तार व सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचा तुटवडा जाणवू नये, यासाठी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात नवीन चार वीज उपकेंद्रालामंजुरी मिळाली आहे. आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. उपकेंद्रांमुळे पुढील पन्नास वर्षापर्यंतचा विजेचा प्रश्न सुटणार आहे.