हर्षवर्धन बोऱ्हाडे नाशिक रोड: नाशिक विभागात शालेय शिक्षणाच्या प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी माझा प्रयत्न असेल. लोकसहभाग घेऊन विविध शिक्षणविषय योजना राबवणार असल्याचे नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक संजयकुमार राठोड यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. शिक्षम क्षेत्रात चर्चिला जाणारा कथित भ्रष्टाचार संपविण्यासाठी नियमानुसार काम, वेळेत काम यालाच आपले प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.