Nashik: अकरावीच्‍या सहा हजार जागा रिक्‍तच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission

नाशिक : अकरावीच्‍या सहा हजार जागा रिक्‍तच

नाशिक : येथील नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दरम्‍यान, यंदा उच्चांकी निकाल लागलेला असतानाही ६० कनिष्ठ महाविद्यालयांत एकूण सहा हजारांहून अधिक जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत.

कोरोना महामारीमुळे दहावी-बारावीच्‍या लेखी परीक्षा होऊ शकल्‍या नव्‍हत्या. त्‍यामुळे शासनाने ठरविलेल्‍या मूल्‍यमापनाच्‍या सूत्राच्‍या आधारे दहावी, बारावीचे निकाल जाहीर केले होते. यंदा उच्चांकी अर्थात जवळपास शंभर टक्क्‍यांपर्यंत निकाल लागला होता. यामुळे अकरावीच्‍या जागा कमी पडतात की काय, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. मात्र, नियमित विद्यार्थ्यांसह काही दिवसांपूर्वी पुरवणी परीक्षेच्‍या निकालात उत्तीर्ण, एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देऊनही अकरावीच्‍या जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

राज्‍यातील निवडक शहरांमध्ये ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया पार पडली. त्‍यांपैकीच नाशिक महापालिका क्षेत्रातही ही प्रक्रिया राबविण्यात आली. याअंतर्गत नियमित विद्यार्थ्यांसाठी नियोजित वेळापत्रकानुसार फेऱ्या, प्रवेशाची विशेष फेरी व प्रथम येणाऱ्यास प्राधान्‍य तत्त्वाद्वारे प्रवेशाची संधी दिली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍याने अशा विद्यार्थ्यांसाठी ऑक्‍टोबरअखेरीस प्रवेशाची संधी उपलब्‍ध केली होती. त्यानंतर अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असल्‍याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

१९ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश

नियमित फेऱ्यांमध्ये यंदाही विज्ञान शाखेच्‍या प्रवेशासाठी चुरस बघायला मिळाली. नाशिक महापालिका हद्दीत असलेल्‍या ६० महाविद्यालयांत २५ हजार ३८० जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध होत्‍या. प्रवेशासाठी २५ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्‍यातून १९ हजार १९० विद्यार्थ्यांनी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यातून सहा हजार १९० जागा रिक्‍त राहिल्‍या आहेत.

loading image
go to top