Nashik News : फसवणूक टाळण्यासाठी बँक - पोलिस समन्वयावर भर; बँक अधिकार्यांची संयुक्त बैठक

Nashik : सायबर भामट्यांकडून बँकेच्या ग्राहकांना संपर्क साधून ना-ना क्लृप्त्या वापरून त्यांच्या बँक खात्यातील पैसे ऑनलाईन काढून फसवणूक केली जाते.
Hemant Patil, Police Inspector of Cyber ​​Police Station while guiding bank officers-representatives at the Nashik Rural Superintendent's office in Adgaon.
Hemant Patil, Police Inspector of Cyber ​​Police Station while guiding bank officers-representatives at the Nashik Rural Superintendent's office in Adgaon.esakal

Nashik News : सायबर भामट्यांकडून बँकेच्या ग्राहकांना संपर्क साधून ना-ना क्लृप्त्या वापरून त्यांच्या बँक खात्यातील पैसे ऑनलाईन काढून फसवणूक केली जाते. यामागे बँक खातेदारांमध्ये असलेला जनजागृतीचा अभाव असून असे प्रकार टाळण्यासाठी बँक आणि पोलीस यांच्यात समन्यवयाची गरज असून, तो असल्यास बँक खातेदारांची फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. (Emphasis on bank police coordination to prevent fraud )

यासंदर्भात नाशिक ग्रामीण पोलिस आणि जिल्ह्यातील बँक अधिकार्यांची संयुक्त बैठकीत अनेक विषयांवर भर देऊन त्यावर सकारात्मक चर्चा झाली. आडगाव येथील नाशिक ग्रामीण अधीक्षक कार्यालयात ग्रामीण सायबर पोलीस ठाणे आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँक यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीला बँकांचे २५ नोडल अधिकारी उपस्थित झाले होते. यावेळी सायबरचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

बँक वा एटीएमशी संबंधित गुन्ह्यांबाबत बँक अधिकार्यांनी पोलिसांशी समन्वय साधून तपासात सहकार्य केले पाहिजे. ऑनलाईन फसवणुकीबाबत बँक खातेदारांसाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. बँक फ्रॉडशी संबंधित गुन्ह्यांची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी, खातेदाराची ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्याची तक्रार दाखल करावी आणि ज्या खात्यात पैसे जमा झाले ते त्वरित गोठवले जाते. यासाठी बँकांची तत्परता महत्त्वाची असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगिलते.

Hemant Patil, Police Inspector of Cyber ​​Police Station while guiding bank officers-representatives at the Nashik Rural Superintendent's office in Adgaon.
Nashik News : शरीराची उष्णता संतुलित राखते लालचुटूक लीची; मालेगावात मोठी मागणी

पोलिसांना येणार्या समस्या

- ऑनलाईन फसवणुकीत संशयितांच्या बँक अकाऊंटची माहिती मिळत उशिरा

- आयपी डीटेल्स, केवायसी मिळत नाही

- एटीएम फसवणुकीत सीसीटीव्ही फुटेज न मिळणे

यावर साधा संपर्क

ऑनलाइन फसवणूक झाल्यास तातडीने १९३० क्रमांकावर तक्रार करावी किंवा केंद्र शासनाने तयार केलेल्या cybercrime.gov.in यावर तक्रार करावी. अनोळखी कॉल्स, मेसेज, लिंकला उत्तरे देऊ नये, बँक केवायसी वा अन्य कारणांसाठी फोन करीत नाही. आमिष दाखविल्या जाणार्या योजनांना बळी पडू नये, असे आवाहन ग्रामीण सायबर पोलिसांनी केले आहे.

Hemant Patil, Police Inspector of Cyber ​​Police Station while guiding bank officers-representatives at the Nashik Rural Superintendent's office in Adgaon.
Nashik ZP News : पाणीपुरवठा योजनांची त्रयस्थ संस्थेतर्फे तपासणी; पूर्ण योजनांची मागविली यादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com