State Excise Department : ‘द क्लाउड’ या रिसॉर्टवर उत्पादन शुल्कची कारवाई

Nashik News : राज्य उत्पादन शुल्कने बेळगावढगा (त्र्यंबकेश्‍वर रोड) येथील ‘द क्लाउड- मेदिनी हॉटेल ॲन्ड रिसॉर्ट’वर कारवाई केली.
'The Cloud' resort on Trimbakeshwar Road.
'The Cloud' resort on Trimbakeshwar Road.esakal

Nashik News : राज्य उत्पादन शुल्कने बेळगावढगा (त्र्यंबकेश्‍वर रोड) येथील ‘द क्लाउड- मेदिनी हॉटेल ॲन्ड रिसॉर्ट’वर कारवाई केली. रूफ टॉप विना मद्यसेवन परवाना व मद्यविक्री सुरू असल्याचे तिथे आढळले. त्यानुसार रोहित अभय उगावकर (रा. पंडित कॉलनी, नाशिक) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द क्लाउड (८०२) या रिसॉर्टबद्दल गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अमृत तांबारे यांनी अचानक छापा मारून रिसॉर्टची तपासणी केली. विहित नोंदवह्या अद्ययावत केलेल्या आढळल्या नाहीत. तसेच, निरीक्षणाअंती नकाशा सादर केला गेला नाही.

विना मद्यसेवन परवाना व मद्यविक्री अशा बाबी तपासणीअंती आढळून आल्या. त्याप्रमाणे मुंबई दारूबंदी अधिनियम १९५३ च्या नियमाच्या ५३, ५८ व ७०(ड) तसेच लायसन्स अटी क्रमांक ४, ५ व ९ तसेच आयुक्त परिपत्रकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (latest marathi news)

'The Cloud' resort on Trimbakeshwar Road.
Nashik Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

राजकीय पदाधिकाऱ्यांचा दबाव

द क्लाउड रिसॉर्टवर राज्य उत्पादनचा छापा पडताच शहरातील काही राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांनी कारवाई न करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरवात केली.

काहींनी तर थेट उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनाच फोन करून कारवाई करू नये, असा आग्रह केला. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने सर्व बाबी तपासून गुन्हा दाखल केला.

'The Cloud' resort on Trimbakeshwar Road.
Nashik Traffic Rules Break : चालकांनो थांबा, मगच बोला...! वाहन चालविताना मोबाईल असतो कानाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com