
सिन्नर : फर्दापूर (ता. सिन्नर) येथील ज्ञानेश्वर अशोक बोराडे (वय ३५), दीपाली ज्ञानेश्वर बोराडे (३०) या दांपत्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २२) सकाळी उघडकीस आली. या दांपत्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली ‘सुसाइड नोट’ आढळून आली असली, तरी त्यातून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेने सारा गाव सुन्न झाला असून, तर्क-वितर्क लढविले जात आहेत.