Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी उचलले टोकाचे पाऊल

Nashik News : शहर परिसरातील उपनगरीय भागांमध्ये तिघांनी राहत्या घरांमध्ये गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली.
Death
Deathesakal

Nashik News : शहर परिसरातील उपनगरीय भागांमध्ये तिघांनी राहत्या घरांमध्ये गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी म्हसरुळ, अंबड व सातपूर पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Nashik Extreme steps taken by three in different incidents marathi news)

मानेनगर परिसरातील राकेश देविदास पवार (३६, रा. आशापुरी सोसायटी, धात्रक फाट्याजवळ) यांनी सोमवारी (ता. २२) सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. भाऊ शुभम देवरे यांनी यांनी उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना जुने सिडकोत घडली. सुमन अतुल महाले (२८, रा. शामराज हाईटस्‌, खोडे मळा) यांनी सोमवारी (ता. २२) दुपारी राहत्या घरात अज्ञात कारणातून ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. (latest marathi news)

Death
Navi Mumbai Crime: पोलिसांनी केली मोठी कारवाई; तब्बल १० लाखांचा एमडी जप्त

याप्रकरणी अंबड पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये घडली. सुरेश भटू आहिरे (४८, रा. श्रमिकनगर) यांनी सोमवारी (ता. २२) पहाटेच्या सुमारास राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. मुलगा शुभम आहिरे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Death
Nashik Crime News : बरॅको हॉटेलवर छापा! हुक्का पार्लर उदध्वस्त; अंमलीविरोधी पथकाची कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com