

Vani Police Bust Suspected Fake Liquor Racket in Nashik Seize 699 Bottles Branded Officer Choice Blue and Royal Stag
esakal
-दिगंबर पाटोळे
वणी (नाशिक) : अंबानेर शिवारातील हॉटेल मल्हार परिसरात बनावट विदेशी दारू तयार करून विक्री करण्याच्या तयारीत असल्याचा प्रकार वणी पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत ऑफिसर चॉइस ब्लू आणि रॉयल स्टॅग या ब्रँडच्या नावाचे लेबल असलेल्या ६९९ सिलबंद बाटल्या, रसायन, रिकाम्या बाटल्या, दारू तयार करण्याचे साहित्य, अल्टो कार आणि मोबाइल असा एकूण ३ लाख ९१ हजार ७४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.