नाशिक: बनावट शालार्थ आयडी प्रकरण चौकशी समितीकडे वर्ग करण्यात यावे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियमबाह्य अटक करू नये, शालार्थ आयडी प्रकरणी निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवार (ता. ८) पासून सामूहिक रजा आंदोलनावर मंगळवारी तोडगा काढण्यात आला. त्यावर कोणत्याही निरपराध अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चुकीची कारवाई होणार नाही, असे आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले.