Nashik News : रावळगावला चोऱ्यांचे सत्र सुरुच; कृषी साहित्य चोरीने शेतकरी त्रस्त

Nashik : रावळगाव (ता. मालेगाव) येथे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर भुरट्या चोऱ्या होत आहेत.
crime
crimeesakal

Nashik News : रावळगाव (ता. मालेगाव) येथे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर भुरट्या चोऱ्या होत आहेत. चोरट्यांनी शेतमळ्यातील वीजपंप, वायर आदी साहित्य चोरीचा जणू सपाटाच लावला असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येत आहेत. रावळगावला पोलिस दूरक्षेत्र असूनही चोरट्यांचा सुगावा लागला नाही. दिवसागणिक चोऱ्यांचे प्रमाण वाढतच असून पोलिस याकडे कधी पाहतील असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. (nashik Farmers are suffering from theft of agricultural materials in Ravalgaon marathi news)

गेल्या वर्षभरात गाव व परिसरातील ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मळ्यातील वीजपंप, पाणबुडी, वायर, बॅटरी, जलपरी, फवारणी यंत्र, पाळीव जनावरे, दुचाकी चोरीचे प्रकार घडले आहेत. शिवाजी कानडे, संदीप आखाडे, राजू मोरे, योगेश राजनोर, युवराज कदम, अक्षय हिरे, बबन कोरलकर, सुरेश साळवे, अंबादास खरे, वसंत अहिरे, चंद्रकांत गायकवाड, भैय्या जाधव, नितीन हाळनोर, सुभाष गेंद, अरविंद शेवाळे, सुभाष भामरे, समाधान मार्तंड, दीपक खैरनार, कैलास चौधरी.

आबा चौधरी, दीपक वाघ, आगिनाथ शिंदे, मंगल शिंदे, गणेश जाधव, विजय वडक्ते, रोशन अग्रवाल, नारायण सोनवणे, हिरालाल मार्तंड, विकास जाधव, ज्ञानेश्‍वर जाधव, गोकूळ सोनवणे, गजेंद्र पवार, कैलास मार्तंड, नंदू सोनवणे, गोविंदा कदम, रवी थोरात आदी शेतकऱ्यांच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत.(latest marathi news)

crime
Nashik News : शालेय पुस्तकांचा पुनर्वापर करूया...! ‘टेक्स बुक एक्स्चेंज ड्राईव्ह: रंगूबाई जुन्नरे शाळेचा स्तुत्य उपक्रम

चोरट्यांनी शेतमळ्यांना लक्ष्य केले आहे. इतर वस्तूंबरोबरच गाय, म्हैस, बैल, बकरी, बोकड आदी जनावरे चोरीचे प्रकार देखील वाढले आहेत. शेतमळ्यातून जनावरे व दुचाकी चोरीचे प्रकारही सातत्याने घडत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. सध्या विहिरींना जेमतेम पाणी आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दिवसा पिकांना पाणी देतात.

वीजपंप व वायर चोरी गेल्यास शेतकऱ्यांना १५ ते २० हजार रुपयांचा भुर्दंड बसतो. चोरट्यांनी रावळगाव ग्रामपंचायतीला देखील सोडले नाही. ग्रामपंचायतीची जलशुद्धीकरण केंद्राजवळील चारशे फूट वायर दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी चोरून नेली. दोन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीचा ३२ अश्‍वशक्तीचा वीजपंप देखील चोरट्यांनी लांबविला आहे. चोऱ्यांचे सत्र सुरुच असताना चोरटे मात्र पोलिसांच्या हाती लागत नाहीत.

''माझ्या विहिरीवरील तीन अश्‍वशक्तीचा वीजपंप चोरट्यांनी गेल्या आठवड्यात चोरुन नेला. वीजपंप चोरीस गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. जवळपास वर्षापासून गावातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या विविध वस्तू चोरीस गेल्या आहेत. चोरट्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. रावळगाव दौऱ्यावर आलेले पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी वाढत्या चोऱ्यांबाबत गाऱ्हाणे मांडले. श्री. भुसे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांना चोरट्यांना पायबंद घालण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र चोऱ्या काही थांबलेल्या नाहीत.''- विजय वडक्ते, रावळगाव.

crime
Nashik News : सनद लावण्यासाठी रुग्णालयांची धावपळ; आजपासून तपासणी मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com