नाशिक- जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर तीन महिन्यांनी न्याय मिळाला आहे. शासनाने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून २५ कोटी ९१ लाख १६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील ३९ हजार ८७४ शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.