Fertilizer
sakal
लखमापूर: खरीप हंगामातील पिकांची वाढ जोमदार व्हावी, यासाठी युरियाची गरज असताना ऐन गरजेच्यावेळी तो शेतकऱ्यांना मिळेनासा झाला आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागल्याने शेतकरी वैतागले आहेत. त्यातच लिंकिंगने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली. दुहेरी संकटात शेतकऱ्याला अडकविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.