Latest Marathi News | नाशिक : पिता आणि पुत्र एकाचवेळी बनले आयर्नमॅन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latest Marathi News

नाशिक : पिता आणि पुत्र एकाचवेळी बनले आयर्नमॅन!

पिंपळगाव बसवंत : अत्यंत खडतर, तितकीच साहसी आमि मानसिकदृष्टया कसोटी पाहणाऱ्या आयर्नमॅन किताबावर पिंपळगावच्या डॉ. अरूण गचाले यांनी तिसऱ्यादा नाव कोरत हॅटट्रीक साधली आहे. विशेष म्हणजे कझाकिस्तानमध्ये झालेल्या या स्पर्धेत डॉ. गचाले यांचा मुलगा आविष्कारानेही वयाच्या सतराव्या वर्षी आयर्नमॅन किताबावर नाव कोरले. पिता-पुत्राने एकाच स्पर्धेत आयनमॅन होण्याचा जगात ही पहिली घटना आहे. (Latest Marathi News)

प्रतिकुल स्थितीत शारीरीक व मानसिक सहनशीलतेचा अंत पाहणारी अशी आयर्नमॅन स्पर्धेची ओळख आहे. यापूर्वी दोनदा आयर्नमॅन झालेले डॉ. अरूण गचाले यांनी कझाकिस्तान येथे स्पर्धेत मुलगा आविष्कारसह सहभाग घेतला. ही स्पर्धा वयाच्या अठरा वर्षावरील स्पर्धेकासाठी असते. पण आविष्कार गचाले यांने सतराव्या वर्षी स्पर्धेत सहभागी होण्याचे धाडस दाखविले. स्पर्धेवेळी कझाकिस्तानचे हवामान स्पर्धेकासाठी प्रचंड आव्हानात्मक होते. सोसाट्याचा वारा असल्याने धावणे, सायकलिंग निर्धारीत वेळेत पूर्ण करताना गचाले पिता-पुत्रांचा कस लागला. हवेचा वेग वाढत असताना मानसिकता खचू नये म्हणून गचाले पिता-पुत्र परस्परांचा उत्साह वाढवत होते. त्यामुळे 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग व 42 किमी धावणे असे उद्दिष्ट 16 तासापूर्वीच साध्य केले.

हेही वाचा: पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबांचा 20 किलोमीटर पायी प्रवास

डॉ. गचाले यांनी यापूर्वी आॅस्ट्रेलिया, जर्मनी येथील स्पर्धेत आयर्नमॅन किताब जखमी अवस्थेत मिळविला होता. पिंपळगाव येथील बालरोगतज्ञ डॉ. गचाले यांनी आयर्नमॅनची हॅट्रीक साधत आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. कझाकिस्तानमधील स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून कठोर परिश्रम घेतले. आविष्कारने दहावीत ९९ टक्के गुण मिळविले आहेत.

''वडिलांची प्रेरणा व मार्गदर्शनाने स्पर्धेत सहभागी होण्याचा निश्‍चय केला. त्यासाठी सहा महिन्यापासून कसून सराव केला. कझाकिस्तानचे वातावरण प्रचंड आव्हात्मक होते. कमॉन अवि...हे वडीलाचे उदगार स्पर्धेत ऊर्जा देत राहीले.'' - आविष्कार गचाले, आयर्नमॅन.

हेही वाचा: जळगावच्या सुपुत्राने फडकविला ‘एल्ब्रुस’वर तिरंगा

Web Title: Nashik Father And Son Became Ironman At The Same Time

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..