Nashik Crime News : वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना मारहाण

Nashik Crime : थकबाकी असलेले वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यासह तिच्या सहकाऱ्यांना तिघांनी महिला कर्मचाऱ्यास ढकलून देत मारहाण केल्याची घटना ओझर (ता. निफाड) येथे घडली.
Nashik Crime
Nashik Crimeesakal

ओझर : थकबाकी असलेले वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्यासह तिच्या सहकाऱ्यांना तिघांनी महिला कर्मचाऱ्यास ढकलून देत मारहाण केल्याची घटना ओझर (ता. निफाड) येथे घडली. मंगळवारी (ता. २०) दुपारी एकच्या सुमारास 'महावितरण'च्या ओझर शहर कक्षाच्या कर्मचारी शिल्पा वैजिनाथ गिरी (सीनिअर टेक्निशियन) सहकारी कर्मचाऱ्यांसह शंकर निंबाजी दाभाडे, निनाद शंकर दाभाडे, निषाद शंकर दाभाडे (तिघे रा. टिळकनगर, टीव्हीएस शोरूमच्या मागे, ओझर) यांच्याकडे वीजबिल वसुलीसाठी गेल्या होत्या. (Nashik Crime Female employees beaten up marathi news)

Nashik Crime
Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी उचलले टोकाचे पाऊल

या वेळी तिघांनी संगनमत करून त्यांच्याकडे असलेले महावितरणचे ऑक्टोबर 2023 ते आजपावेतोचे आठ हजार 210 रुपये थकबाकी वीजबिल वसुली करण्यापासून परावृत्त होण्यासाठी शिल्पा गिरी व मधुरा शेलार यांच्याशी लज्जास्पद वर्तन करत ढकलून दिले. तसेच गिरी व त्यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Nashik Crime
Nashik News: पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी; घटनेने शहर हादरले

शंकर दाभाडे याने कर्मचारी नितीन लोकनार यांची कॉलर पकडून शर्टाची बटणे तोडली. श्रीमती गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांना "तुम्ही लाईट कनेक्शन चालू करा, नाहीतर तुम्ही येथून कसे जाता तेच पाहतो!" अशा धमक्या देत सरकारी कामात अडथळा आणला.

शिल्पा गिरी यांनी तक्रार नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गरुड तपास करीत आहेत.( latest marathi news )

Nashik Crime
Nashik Crime News : वीजबील वसुली साठी गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचारीना मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com