Nashik Akhaji Festival : बीज परिक्षण औजार पूजनाने आखाती गौराई; सुरगाणा -डांग सीमावर्ती आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने सण साजरा

Nashik News : अक्षय तृतीया हा सण या आदिवासी बहुल भागात अनेक वर्षांपासून आखाती गौराई म्हणून सण साजरा केला जातो.
Tribal Sisters Carrying Baskets in Traditional Way
Tribal Sisters Carrying Baskets in Traditional Way esakal
Updated on

सुरगाणा : तालुक्यातील डांग सीमावर्ती भागातील आदिवासी बांधव आजही अनेक सण,समारंभ,उत्सव पारंपरिक पद्धतीने आजही साजरे केले जातात. अक्षय तृतीया हा सण या आदिवासी बहुल भागात अनेक वर्षांपासून आखाती गौराई म्हणून सण साजरा केला जातो. निसर्गपूजक,धरतीपूजक आदिवासी बांधवांनी पंचमहाभूतांची आळवणीतून सण साजरा केला.

आखाती गौराई हा आदिवासी बांधवाचा वर्षातील शेवटचा सण. याला बुडीत सणही म्हटले जाते. या सणाला घरोघर टोपलीत पाच प्रकारचे धान्य (धान) मातीत पेरून रोज नित्य नियमाने पाणी व शिजवलेल्या अन्नाचे नैवेद्य दाखवले जाते. घरोघर "धान" पूजनातून पावसाळ्यापूर्वीच बीज परिक्षण करीत शेती औजारांचे पूजन केले जाते.

गौराई पूजन आणि मिरवणूक

सात दिवस अगोदरच गौराई घातली जाते. गौराई घालणे म्हणजे पाच धान्य भात,नागली, मका,तुर,उडीद यासह वेगवेगळ्या प्रकारचे धान्य एका बांबू पासून विणलेल्या(शेणुलगा) शेण टाकायच्या टोपलीत माती भरून हे धान्य पेरले जाते. सात दिवस सकाळ,संध्याकाळ पाणी घातले जाते.

हि टोपली ओसरीवर एका कोपऱ्यात बांबूचे कणसं खुड्या झिला खाली झाकून ठेवले जाते. त्याला सूर्य प्रकाश,ऊन,हवा लागू दिली जात नाही. त्यामुळे उगवणारी रोपे पिवळी पडतात. सणानिमित्त नुकतेच लग्न झालेली मुलगी सासरहून माहेरी येते.सात दिवसानंतर पारंपरिक पद्धतीने संबळ, कहाळ्या या वाजंत्रीने जल्लोषात गौराईची मिरवणूक काढली जाते. (latest marathi news)

Tribal Sisters Carrying Baskets in Traditional Way
Nashik News : वकिलांच्या रक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडू : डॉ. सुभाष भामरे

बीज परिक्षणाची प्रथा...

प्रत्येक घरातील गौराईची टोपली घेउन नटून थटून डोक्यावर ठेवून मिरवणूक गावातून विहीर,नदी,तलाव,पाण्याचा झरा, या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जमिनीवर वाळूने इशव-या देव व राक्षस यांच्या प्रतिमा काढतात.त्या निसर्ग देवाला महिला सोन्याची नथ घालतात. ज्येष्ठ महिला हातात घागर घेऊन फुंकून मोठा आवाज काढून त्या धुळीत,वाळूत रेखाटलेल्या प्रतिमेवर नाचत ती पुसली जाते. त्यानंतर उगवलेल्या गौराईचे परिक्षण,निरिक्षण, केले जाते.

अवजारांचे पूजन

शेतीच्या कामाच्या वस्तू फाळ,असू, कासरा,खोडगी,घरटी,विळा या वस्तू झाकून ठेवतात. त्या महिलांना ओळखण्यासाठी सांगितले जाते.जर नेमके ओळखता आले नाही तर महिला झुंडशाही करीत झाकलेले झिला उचलून धरतात.भुत्या म्हणजे चक्रीवादळ,वावटळ याची पुजा केली जाते.पेरलेले बियाणे उगवण होण्यास योग्य आहे की कमजोर याची परीक्षा करतात. घरातील जे मृत पूर्वजांचे स्मरण केले जाते. त्यास अगारी टाकणे असे म्हणतात.

Tribal Sisters Carrying Baskets in Traditional Way
Nashik NMC News : बंदोबस्तात धोकादायक इमारती, वाडे उतरविणार; महापालिका आयुक्तांच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com