Nashik Police Recruitment : हुश्श... पोलिसात भरती व्हायचंय! उद्यापासून भरा ऑनलाईन अर्ज

Police Recruitment : शासनाने राज्यात १७ हजार पोलिस शिपायांची भरती करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती.
Nashik Police Recruitment
Nashik Police Recruitmentesakal

Nashik Police Recruitment : शासनाने राज्यात १७ हजार पोलिस शिपायांची भरती करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. परंतु भरती जाहीर होत नसल्याने पोलिस भरतीची तयारी करणार्या युवकांची धाकधुक वाढली होती. अखेर शासनाने भरती जाहीर केल्यानंतर युवकांनी सुस्कारा सोडला आहे. या भरतीमध्ये नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात ११७ तर, नाशिक ग्रामीणमध्ये ३२ रिक्त जागांवर पोलीस शिपाई भरतीची प्रक्रिया सुरू होते आहे. (nashik Fill online application for police recruitment marathi news)

शासनाच्या आदेशानुसार, राज्यभरात पोलिस शिपाई पदासाठीची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानुसार, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात ११८ तर, नाशिक ग्रामीण पोलीस दलात ३२ रिक्त जागांसाठी पोलिस भरतीची प्रक्रिया मंगळवारपासून (ता. ५) सुरू होते.

त्यासाठी policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भरतीसंदर्भातील माहिती देण्यात आली असून, यावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज उमेदवारांना सादर करता येणार आहे. आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे.

अशी असेल प्रक्रिया

या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण असलेले अपात्र ठरतील. (latest marathi news)

Nashik Police Recruitment
Police Patil Recruitment : पोलिस पाटलांच्या रिक्त १३३ जागा लवकरच भरणार; ३० जूनला आरक्षण सोडत

आयुक्तालयात ६ वर्षांनी भरती

शहर पोलीस आयुक्तालयामध्ये २०१७ मध्ये ७९ पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबविलेली होती. त्यानंतर गेल्या सहा वर्षांपासून शहर पोलिस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदांसाठीची भरती घेण्यात आलेली नाही. यावेळी ११८ पदांसाठी भरती होते आहे.

अशा आहेत रिक्त जागा

प्रवर्ग........... शहर आयुक्तालय...........ग्रामीण

- अ.जा..........१९........०३

- अ.ज...........२३........०७

-विजा(अ)......००........ ०१

- भ.ज.(ब)......००.......०१

- भ.ज.(क)......००......०१

- भ.ज.(ड)......००.....०१

- विमाप्र..........०४...... ०१

- इमाव...........०२.....०५

- एसई बीसी.....१२.....०३

- इडब्ल्युएस......२०....०३

- खुला...........३८.......०६

एकूण ............११८.......३२

Nashik Police Recruitment
Police Patil Recruitment : ‘पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया सुरू करा’

तर येथे साधा संपर्क

पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान कोणी पैशांची मागणी करीत असल्यास संबंधितांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाशी ०२५३-२५७८२३० / १०६४ यावर संपर्क साधावा अन्यथा पोलिस आयुक्त कार्यालय - ०२५३ २३०५२३३/२३०५२३४, नाशिक ग्रामीण ०२५३-२३०९७००/२२००४५० यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Nashik Police Recruitment
Police Patil Recruitment : पोलिस पाटील भरतीबाबत प्रश्नचिन्ह? जिल्ह्यात भरतीची जाहिरात; माहूर-किनवटला आरक्षण सोडत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com