Water taken from storage ponds that supply water to the city
Water taken from storage ponds that supply water to the cityesakal

Nashik News : तलाव भरल्याने दीड महिन्याचा प्रश्न मिटला; साठा वाढेपर्यत येवल्याला 5 दिवसाआड पाणी

Nashik : पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात पाणी भेटल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.

Nashik News : पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात पाणी भेटल्याने पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे. धरणात अल्प पाणीसाठा असल्याने आवर्तनातून कमी प्रमाणात पाणी दिल्याने पुढील दीड महिन्याचा प्रश्न मिटला असला तरी शहराला सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. ( Filling lake solved one month water problem of palkhed )

शहरालगत गंगासागर तलाव आणि टप्पा दोनच्या साठवण तलावावर शहराची भिस्त असते. तलावात सुमारे चार मीटर म्हणजेच ५० दशलक्ष घनफुटाच्या आसपास पाणी साठवले जाते. एकदा घेतलेले पाणी साधारणता तीन दिवसाड पाणीपुरवठा केला तरी दोन महिने हे पाणी पुरते. या तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा झिरपा होऊन अपव्यय होतो हे सर्वश्रुत असूनही त्यावर उपाययोजना होत नसल्याने पाणीवाया जाऊन शहरावर त्याचा भार पडतो.

यावर्षी वेळोवेळी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळाल्याने शहराला दुष्काळातही टंचाईचा फटका सहन करण्याची वेळ आली नाही. हे सुखावह असले तरी तीन-चार महिन्यापासून पाच दिवसाआड पाणीपुरवठा शहराला करावा लागत आहे. पालखेड पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने २५ मार्च ते ९ एप्रिलला बिगर सिंचन पाणी आवर्तन दिले होते. त्यापाण्यावर आतापर्यंत गरज भागली मात्र मागील आठवड्यात पाणी साठवण तलाव उघडा पडल्याने शहरावर पाणी टंचाईचे ढग जमा झाले.

Water taken from storage ponds that supply water to the city
Nashik News : हरवलेली चिमुकली काही तासात नातेवाइकांच्या ताब्यात; आडगाव पोलिसांची कामगिरी

गाळ मिश्रित पाणीपुरवठाही झाला. मात्र मागणी करताच पालखेड डावा कालव्याद्वारे १ जूनपासून आणि आवर्तन सोडण्यात आले. मनमाड , येवला नगरपरिषदेसह तालुक्यातील ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,मध्य रेल्वे मनमाड व ग्रामपंचायत आंबेगांव या शासनमान्य पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन भेटल्याने चार दिवसांत साठवण तलावात २.८५ मीटर म्हणजेच सुमारे ३० दशलक्ष घनफुट पाणी घेतले आहे. शुक्रवारी हे पाणी बंद झाले असून आता शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.मात्र धरणे आटल्याने आता जोरदार पाऊस होऊन धरणात पुरेशा प्रमाणात पाणी येईपर्यंत आवर्तनाची शक्यता कमीच आहे.

त्यामुळे हे पाणी दीड महिने पुरणार आहे पण वेळेत धरणाचा पाणीसाठा वाढवणारा पाऊस न पडल्यास काय हा प्रश्न आहे. साठवण तलावाच्या बाजूच्या विहिरीवरून ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी सुमारे ११८ टँकर भरले जातात.तलाव आटला की विहिरी आटून टँकर भरण्याचा प्रश्न निर्माण होतो.आता तलाव भरल्यामुळे टॅंकरचाही प्रश्न मिटला आहे.अर्थात मुबलक प्रमाणात पाण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Water taken from storage ponds that supply water to the city
Nashik News : पॉवर ट्रान्सफार्मर फुटल्याने नाशिक शहरासह 80 गावांचा वीज पुरवठा खंडित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com