Nashik Fire Accident : मुंबई नाका पोलीस ठाण्यात जमा असलेल्या दोन चारचाकीना आग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cars Caught Fire

Nashik Fire Accident : मुंबई नाका पोलीस ठाण्यात जमा असलेल्या दोन चारचाकीना आग!

जुने नाशिक : मुंबईनाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात जमा असलेल्या दोन चारचाकीना अचानक आग लागण्याची घटना बुधवार (ता.१८) चार वाजेच्या सुमारास घडली. अग्निशामक विभागास माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत अवघ्या काही वेळात आगेवर नियंत्रण मिळविले. (Nashik Fire Accident Two four wheelers stored in Mumbai Naka Police Station caught fire nashik news)

अपघात, चोरी, दरोडा अशा विविध गुन्ह्यात असलेले वाहने पोलिसांकडून जमा केली जातात. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या बाहेर असेच काही जमा केलेली वाहने उभी करण्यात आली आहे. बुधवार (ता.१८) दुपारी चार वाजेच्या सुमारास या वाहनांमधील दोन चारचाकीना अचानक आग लागली.

आगेचे लोट दिसताच पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. अग्निशामक विभागास घटनेची माहिती देण्यात आली. लीडिंग फायरमन एस बी निकम, फायरमन इसाक शेख, एस एन गांगुर्डे, एस एफ फुगट, एच बी बेळगावकर, एम डी कदम, टी एस संत्रस पाच मिनिटात त्यांनी घटनास्थळ गाठले.

आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या काही वेळात आगेवर नियंत्रण मिळविले. अनेक वर्षांपासून वाहने उभे असल्याने वाहनांनी क्षणात पेट घेतला. आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात जळीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News : बागलाणच्या 1 हजार शिक्षकांचे वेतन उशिरा! बँकेच्या कारभारावर शिक्षक नाराज

सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. शिवाय अग्निशामक पथक वेळीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा अन्य वाहनांनी पेट घेतला असता. पोलीस ठाणे देखील आगेच्या कचाट्यात आले असते. अनेक वर्षांपासून वाहने बंद असताना आग लागली कशी याचे गुड कायम असून परिसरातील नागरिकांनी आग लागण्याच्या घटनेस घेऊन आश्चर्य व्यक्त केले आहे.

पोलीस ठाण्याबाहेर धावत्या वाहनांना आग लागणे लक्षात येते. परंतु अशा प्रकारे उभ्या वाहनांना आग लागणे आश्चर्याचे आहे. रस्त्याने चालताना धूम्रपान करणाऱ्यांनी बिडी किंवा सिगरेट फेकली असावी.

त्यातून आग लागली असावी किंवा गुन्हेगारा प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पोलिसांप्रती असलेल्या रागातून अशा प्रकारची घटना करण्याची शक्यता आहे. अशी चर्चा परिसरात सुरू होती. पोलीस तपासात निश्चित कारण बाहेर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Nivruttinath Maharaj Yatrotsav : दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी! पाहा Photos

टॅग्स :NashikFire Accident