
निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : ‘पुष्पा पार्ट वन व टू’ या चित्रपटातील कथानक खैर तस्करीशी संबंधित आहे. चित्रपटाप्रमाणेच खैर तस्करी करणाऱ्यांचे जाळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पसरले होते. मात्र वर्षभरातल्या वनविभागाने केलेल्या धडक कारवाईमुळे खैर तस्करीस मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे. एक प्रकारे नाशिक वन विभागाने प्रति पुष्पा सिनेमाच वर्षभरात खैर तस्करांच्या विरोधात प्रदर्शित केला आहे.