Nashik News : पाथर्डी फाटा चौकाला कचराकुंडीचे स्वरूप; मुंबई नाक्याप्रमाणे सुशोभीकरणाची मागणी

Nashik News : पाथर्डी फाटा चौकातील उड्डाणपुलाखालील परिसराला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Garbage dump under the flyover
Garbage dump under the flyoveresakal

इंदिरानगर : पाथर्डी फाटा चौकातील उड्डाणपुलाखालील परिसराला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई नाक्याप्रमाणे येथेदेखील सुशोभीकरण करण्याची मागणी केली जात आहे. पाथर्डी फाटा चौक ते टोयोटा शोरूमपर्यंतच्या सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरापर्यंत पुलाखालील जागेत सर्वत्र मोठे खड्डे. (Form of Garbage at Pathardi Phata Chowk)

अस्ताव्यस्त वाढलेली शोभेची झाडे आणि या खड्ड्यांमध्ये साचलेला भरमसाट कचरा अशी परिस्थिती या जागेची झाली आहे. आसपास असलेले हॉटेल्स, सरबत, रस आदींसह खाद्यपदार्थांचा कचरा सर्रास या ठिकाणी टाकला जात आहे. इथून गेले तरी येथील दुर्गंधीला सामोरे जावे लागते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे येथे लावण्यात आलेल्या झाडांचीदेखील छाटणी न केल्याने झाडे वाढली आहेत.

या ठिकाणी लावलेल्या संरक्षक पट्ट्या तोडून आतमध्ये खासगी वाहन चालक निवांत गाड्या पार्क करत आहेत. तेथे जागा मिळाली नाही तर बाहेर असलेल्या सर्व्हिस रस्त्यावरदेखील खासगी प्रवासी वाहनांसह, जेसीबीदेखील पार्क केले जातात, असे नागरिक सांगतात. भटकंती करणाऱ्या कुटुंबांचे बिऱ्हाडे या ठिकाणी आता दिसून येत आहेत.

एका कोपऱ्यात जुन्या म्हसोबा मंदिराचे सजावटीचे काम सध्या सुरू आहे. हा छोटासा भाग सोडला तर इतरत्र मात्र आनंदी आनंद दिसत आहे. येथील चौकाचे रुंदीकरण करून तो सुशोभित करण्याच्या गेल्या अनेक वर्षांपासून केवळ गप्पा मारल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कृती होत नसल्याने आहे तीच परिस्थिती अधिक बिकट होत आहे. या ठिकाणी होत असलेले हे अनधिकृत अतिक्रमण हटवून या जागेचे सुशोभीकरण करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. (latest marathi news)

Garbage dump under the flyover
Nashik Water Shortage : जिल्ह्यात 6 लाख नागरिकांची भागतेय टँकरच्या पाण्यावर तहान

"हा चौक मुंबईकडून शहरात येण्यासाठी प्रवेशद्वार मानले जाते. या भागाचे सुशोभीकरण झाले तर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे संबंधितांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे." - रवींद्र कदम, स्थानिक

"मध्यंतरी या ठिकाणी संरक्षक पट्ट्या बसविल्यानंतर आता हा भाग सुशोभित करण्यात येईल असे वाटले होते. मात्र आहे तीच परिस्थिती असून सर्वत्र कचरा, खड्डे, दगड मातीमध्ये ही जागा लुप्त झाली आहे. इतर ठिकाणी केलेल्या सजावटीप्रमाणे सजावट झाली पाहिजे." - सचिन कापडणीस, स्थानिक नागरिक

"नोकरीनिमित्त दररोज या चौकातून ये- जा करतो. दिवसेंदिवस या जागेवर अतिक्रमण वाढत आहे. ते दूर करून येथे आकर्षक सजावट करणे गरजेचे आहे." - देवीदास कुवर, प्रवासी

Garbage dump under the flyover
Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com