Nashik Fraud Crime : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना गंडविणारा जेरबंद; 20 लाखांना घातला गंडा

Fraud Crime : महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या नावावर २० लाख कर्ज काढून पसार झालेल्या संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal

नाशिक : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या नावावर २० लाख कर्ज काढून पसार झालेल्या संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. मनोज आनंदराव गवई (४१, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजी नगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. (Nashik Fraud Crime 20 lakhs cheated while living in relationship marathi news)

संशयित मनोज याच्याविरोधात यापूर्वीही अंबड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. त्यात जागा विक्रीच्या बहाण्याने संशयिताने खरेदीदारास सुमारे २ लाख रुपयांचा गंडा घातला होता. पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, पीडित महिलेसोबत संशयित लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संभाजी चौक परिसरात राहत होता. त्यावेळी त्याने महिलेच्या नावे परस्पर सुमारे २० लाख रुपयांचे कर्ज काढले. मात्र कर्ज फेड न करता संशयित पसार झाला.

Fraud Crime
Nashik Fraud Crime : मंत्र्यांचा पीए असल्याचे सांगत 80 लाखांना गंडा

याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोन गुन्हे दाखल झाल्यानंतरही संशयित मोकाट होता. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील पोलिस नाइक प्रशांत मरकड यांना संशयिताची खबर मिळाली असता, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून गंगापूर गाव परिसरातून मनोजला शिताफीने अटक केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रदिप म्हसदे, विशाल काठे, विशाल देवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Fraud Crime
Nashik Fraud Crime News : रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून गंडविले; गंगापूर रोड परिसरातून संशयिताला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com