Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Crime News : याप्रकरणी संशयित युवतीविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal

Nashik Fraud Crime : आर्किटेक्ट असलेल्या व्यावसायिकाकडे काम शिकण्यासाठी असलेल्या युवतीने तब्बल ५ लाख ४३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित युवतीविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Fraud Crime architect cheated of five half lakhs)

प्रतिक्षा अनिल मोरे (रा. पाथरथेंबे, ता. चांदवड) असे संशयित युवतीचे नाव आहे. आर्किटेक्ट निलेश अर्जून दळवी (रा. एकदंत रो हाऊस, ध्रुवनगर, कॅनॉलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे गोविंदनगर येथील विश्वज्योती अपार्टमेंटमध्ये आस्थापना आहे. त्यांच्याच शेजारील आस्थापनेमध्ये संशयित प्रतिक्षा मोरे ही नोकरीला होती.

परंतु वेळ काढून ती दळवी यांच्याकडे काम शिकण्यासाठी येत असे. याच दरम्यान, तिने दळवी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने दळवी यांच्याकडे स्वत:ला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यावेळी त्यांनी तिला कधी रोख तर कधी ऑनलाईन स्वरुपात ५ लाख ४३ हजार रुपयांची मदत केली. (Latest Marathi News)

Fraud Crime
Mumbai Crime: विवाहितेचे अडीच लाखांचे दागिने लुटले; वाचा संपूर्ण घटना

संशयित युवतीने व्यवसाय सुरू केल्यानंतरही दळवी यांना दिलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे त्यांनी संशयितेकडे दिलेल्या पैशांची मागणी केली असता, तिने उलट त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दळवी यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयितेविरोधात फसवणूक व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक सुधीर पाटील हे तपास करीत आहेत.

Fraud Crime
Crime News : भावाने काढला भावाचा काटा! चोवीस तासांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com