नाशिक: घराच्या सुखशांतीसह आर्थिक उन्नतीसाठी संशयित मित्रानेच मित्राला घरात सुवर्णशांती पूजा विधी करण्यास सांगितली. त्याप्रमाणे सुवर्णशांती पूजा केली असता, संशयित मित्रानेच पूजाविधीसाठी ठेवलेले सुमारे साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तब्बल अडीच वर्षांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.