Nashik Student Fight : अशोकस्तंभावर 2 गटात राडा; क्लासेसच्या विद्यार्थ्यांमध्ये रस्त्यावरच फ्रि-स्टाईल

Latest Student Fight News : अशोकस्तंभ परिसरातील खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली.
Two groups of students of private classes got into a violent fight.
Two groups of students of private classes got into a violent fight.esakal
Updated on

नाशिक : अशोकस्तंभ परिसरातील खासगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. सदरची फ्री-स्टाईल सुरू असतानाच पोलिस गाडी जात असताना त्यांनी सायरन वाजविताच हाणामारी करणार्यांनी पोबारा केला. याप्रकरणी मात्र पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नव्हती. अशोकस्तंभ परिसरात बहुसंख्येने खासगी क्लासेस आहेत. ( Free style fight on stress among students of 2 groups on Ashoka Stambh )

शनिवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अशोकस्तंभ येथील क्लासेसमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन टोळक्यांमध्ये अचानक हाणामारी सुरू झाली. दोन-तीन विद्यार्थ्यांवर दुसर्या गटातील आठ-दहा जण तुटून पडले. बघता-बघता गर्दी झाली. यावेळी रस्त्याने जाणार्यांनीही विद्यार्थ्यांना रोखण्याऐवजी मोबाईलवर फोटो व व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली.

दरम्यान, त्याचवेळी मेहेर सिग्नलकडून अशोकस्तंभाकडे पोलीस वाहन जात होते. रस्त्यावर गर्दी दिसल्याने पोलीस वाहनचालकाने सायरन वाजविताच हाणामारी करणार्या विद्यार्थ्यांनी पोबारा केला. मात्र याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल नव्हती.

Two groups of students of private classes got into a violent fight.
Nashik Girls Fight : नाशिकमध्ये तरुण मुली भिडल्या; फ्रिस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com