Nashik Dr. Rathi Attack : आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून डॉ. राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला

Nashik Dr. Rathi Attack : डॉ. कैलास राठी यांच्यावर शुक्रवारी (ता. २३) संशयित राजेंद्र मोरे (वय ३७) याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता.
Dr. Kailas Rathi
Dr. Kailas Rathiesakal

Nashik Dr. Rathi Attack : नाशिक बाजार समिती आवाराच्या इमारतीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी (वय ४९) यांच्यावर रुग्णालयात अकाउंटंट म्हणून पूर्वी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या पतीने आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून धारदार कोयत्याने वार करून ठार करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनेबाबत डॉ. राठी यांच्या पत्नी डॉ. रीना राठी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. (Nashik from financial exchange dispute Assault on Dr Rathi)

दरम्यान, हल्लेखोर राजेंद्र चंद्रकांत मोरे याला पंचवटी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. डॉ. कैलास राठी यांच्यावर शुक्रवारी (ता. २३) संशयित राजेंद्र मोरे (वय ३७) याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्यानंतर संशयित फरारी झाला होता.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन जाधव यांनी या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करीत संशयिताला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी पथके रवाना केली होती.

हवालदार शेखर फरताळे यांना संशयित राजेंद्र मोरे हा जुना आडगाव नाका येथील संतोष टी पॉइंट येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर, मिथुन परदेशी, श्री. फरताळे, अशोक काकड, संतोष जाधव, राजेश सोळसे, यतीन पवार, श्रीकांत कर्पे, युवराज गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.

डॉ. राठी यांच्या पत्नी डॉ. रीना राठी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार २०१८ मध्ये संशयिताची पत्नी राठींच्या रुग्णालयात अकाउंटंटचे काम करीत होती. काम करताना हिशेबात पाच ते सहा लाख रुपयांची तफावत आढळल्याने तिला कामावरून काढून टाकले होते. तब्बल चार वर्षांनी तिने पुन्हा डॉ. राठी यांची भेट घेत नोकरीवर घेण्याची विनंती केली.

Dr. Kailas Rathi
Nagpur Crime: नागपूर फोटोग्राफर खून प्रकरण, गोळ्या झाडणारा बंगळूरचा? बंदुकीला सायलेन्सर लावून केली होती हत्या

डॉ. राठी यांच्या विविध ठिकाणी असलेल्या जमिनीशी निगडित कामे करण्याची जबाबदारी तिला दिली होती. त्या वेळी तिने कामाच्या नावाखाली डॉ. राठी यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले. मात्र, ज्या कामासाठी पैसे घेतले ते काम केलेच नाही. डॉ. राठी यांनी मोरे दांपत्याकडे असलेल्या १८ लाख रुपयांची मागणी केली.

तेव्हा वेळोवेळी पैसे परत करतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही पैसे परत दिले नाहीत. शुक्रवारी रात्री नऊला संशयित मोरे हा डॉ. राठी यांना रुग्णालयात भेटण्यासाठी आला होता. त्या वेळी केबिनमध्ये डॉ. राठी फोनवर बोलत असताना मोरे याने कोयता काढून त्यांच्या डोक्यावर व गळ्यावर असे एकूण १९ वार केले आणि घटनास्थळावरून फरारी झाला.

जखमी डॉक्टरांवर तेथेच प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संशयावरून हल्ला

बदनामीकारक मजकूर असलेली पत्रके संशयित राहत असलेल्या परिसरात व काम करीत असल्याच्या ठिकाणी अज्ञाताने वाटली होती. संशयितास हे पत्रक वाटण्यामागे डॉक्टरांचा हात असल्याचा संशय आल्याने त्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

Dr. Kailas Rathi
Crime News: भावानेच केला भावावर हल्ला; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com