Nagpur Crime: नागपूर फोटोग्राफर खून प्रकरण, गोळ्या झाडणारा बंगळूरचा? बंदुकीला सायलेन्सर लावून केली होती हत्या

राजनगर परिसरातील सुराणा लेआऊटमध्ये दिवसाढवळ्या घरात शिरून बंदुकीने गोळी झाडून छायाचित्रकाराची शनिवारी (ता.२४ ) दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Nagpur Crime: नागपूर फोटोग्राफर खून प्रकरण, गोळ्या झाडणारा बंगळूरचा? बंदुकीला सायलेन्सर लावून केली होती हत्या

Nagpur Vinay Punekar Murder Case: राजनगर परिसरातील सुराणा लेआऊटमध्ये दिवसाढवळ्या घरात शिरून बंदुकीने गोळी झाडून छायाचित्रकाराची शनिवारी (ता.२४ ) दुपारी साडेबारा ते एक वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

विनय पुणेकर (वय ५४) असे मृत मुक्त छायाचित्रकाराचे नाव आहे. शनिवारी दुपारी ते घरी असताना त्यांच्याकडे ३० ते ३५ वयोगटातील एक इसम आला. अडीच मिनिटात तो निघूनही गेला. काही वेळाने त्यांच्या घरी एक मुलगी बाजूच्या मैदानात कार्यक्रम घ्यायचा असल्याने परवानगीसाठी आली. तिने विनय यांना आवाज दिला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दार थोडे उघडे दिसल्याने उघडले असता विनय खाली पडले असल्याचे दिसले. त्यांनी लगेच बाहेर जाऊन ही माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यांनी विनयचा मुलगा प्रेज याला कळवले. तो घरी आला असता त्याला विनयच्या गळ्यावर गोळी लागलेली दिसली आणि बाजूला गोळीचे आवरण पडलेले दिसले.

त्याने तत्काळ ही माहिती सदर ठाण्यातील पोलिसांना दिली. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलिस आयुक्त बाविस्कर आणि पोलिस निरीक्षक मनीष पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा लगेच घटनास्थळी दाखल झाला. श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकही दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक जण घरातून बाहेर जाताना आढळून आला.

पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी नातेवाईक आणि परिसरातील परिचितांनी मोठी गर्दी केली होती. सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे यांनीही भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, गुन्हे शाखेचे पथके आरोपीचा शोधात चारही दिशेने पाठविण्यात आली आहेत.(Latest Marathi News)

मित्रांची बातचीत
मावशी तारा आणि लीला दुबे यांच्याकडे विनय राहत होते. मावशींनी हिस्सेवाटप करीत हे घर विनयला दिले होते. तेव्हापासून विनय हे सुराणा लेआऊट येथील प्लॉट क्रमांक अकरामध्ये राहत होते. २००६ साली त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे पत्नी कॅरेल आणि मुलगा प्रेज हे दोघेही विजयनगरात वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नी एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. एकटेच राहणाऱ्या विनय यांच्याकडे कधी-कधी मुलगा येत होता.

काही दिवस छायाचित्रकार म्हणून वर्तमानपत्रात नोकरी केल्यावर ते दिनशॉ कंपनीत कामाला होते. त्यानंतर त्यांनी मुक्त छायाचित्रकार म्हणून काम सुरू केले होते. शनिवारी अकराच्या सुमारास त्यांच्या मित्राने लंगरमधील जेवणाचा डबा त्यांच्याकडे आणून दिला. डब्यातील काही अन्न विनय यांनी मागे राहणाऱ्या व्यक्तीला दिले. त्यानंतर ते समोरच्या चौकातही काही कामानिमित्त जाऊन आले. या काळात त्यांचे दोन मित्रांशी फोनवरही बोलणेही झाले. कुणीतरी भेटायला येणार असे सांगून त्यांनी फोन ठेवला. मात्र, काही वेळातच विनय यांच्या मृत्यूची वार्ता आली. (Latest Marathi News)

आरोपी बेंगळुरूचा?
विनय यांच्या गळ्यावर गोळी झाडणारा आरोपी बेंगळुरू येथून आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याने घरात शिरून बंदुकीला सायलेन्सर लावून गोळी झाडल्याने शेजाऱ्यांनाही आवाज आला नाही. घरातून निघून आरोपी नजीकच्या पोलिस तलावापर्यंत चालत गेला आणि त्यानंतर पसार झाला.

Nagpur Crime: नागपूर फोटोग्राफर खून प्रकरण, गोळ्या झाडणारा बंगळूरचा? बंदुकीला सायलेन्सर लावून केली होती हत्या
Wardha Yavatmal Railway: वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज रेल्वेचे काम पूर्ण, पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com