Nashik imported fruit market price today
esakal
नाशिक : पावसाळा सुरू झाला असून, पहिला टप्पा दमदारपणाने कोसळला. त्यामुळे भाजीपाल्याचे मार्केट थोड्या प्रमाणात डाऊन झाले असले तरी फळांची बाजारपेठ मात्र अद्यापही चढ्या भावानेच विक्री करत (Kiwi price in Nashik fruit market) आहे. त्यातही परदेशी फळांनी बाजारपेठ काबीज केली असून आलूबुखारा, किवी आणि खजूर तब्बल ६०० रुपये किलोने मिळत आहे. ड्रॅगन फ्रूट १५० रुपये किलो असून, अद्याप उशिराने आलेले आंबे बाजारात विक्रीला आहेत. १०० रुपयांचे ३ किलो या भावाने आंबे मिळत आहेत.