Sharad Pawar : शरद पवारांनी ईडीला उघडं पाडलं, थेट आकडेवारी सांगत केली पोलखोल! 

Sharad Pawar : ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर विरोधकांच्या विरोधात केल्या जात असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच महागाई, बेरोजगारीमुळे जनता त्रस्त असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
Sharad Pawar
Sharad Pawar esakal

Sharad Pawar :  कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध प्रचंड नाराजी आहे. देशात सरकार विरोधात प्रचंड अस्वस्था आहे. याचा फटका सरकारला बसणार आहे. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर विरोधकांच्या विरोधात केल्या जात असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच महागाई, बेरोजगारीमुळे जनता त्रस्त असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी आज नाशिक येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले आणि सरकारवर हल्लाबोल केला. सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे ते विरोधकांवर हल्ला करण्याचे त्यांचे पाऊले दिसते. ईडी, सीबीआय विरोधकांच्या मागे लावतात. मात्र विरोधक जेव्हा कोर्टात जातात तेव्हा निकाल सरकारच्या विरोधात लागतो, असे शरद पवार म्हणाले.

२००५ ते २०२३ दोन सरकार येवून गेली. आम्हा लोकांचे देखील सरकार होतं. आता नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. या सतरा वर्षात ५ हजार ९०६ ईडी केसेस दाखल झाल्या. यामध्ये फक्त पॉईंट २५ टक्के कसेस निकाली निघाल्या. तर शिक्षा होण्याचे प्रमाण पॉईंट ४० टक्के आहे. याचा अर्थ केवळ केसेस करायच्या आणि जेलमध्ये टाकायचं. संजय राऊत, अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकलं. नंतर आरोपात दम नसल्याचे स्पष्ट झाले.

Sharad Pawar
ICC Test Ranking : टाइगर का हुकुम... पुन्हा एकदा अश्विन बनला 'नंबर १'; रोहित अन् जैस्वालचीही 'यशस्वी' झेप

शरद पवार म्हणाले,  २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने १२१ लोकांची चौकशी मोदी सरकारने केली. त्यातील ११५ जण विरोधी पक्षामधील होते. याचा अर्थ ईडी फक्त विरोधी पक्षांसाठी वापरली गेली. यामध्ये काँग्रेस २६, टीएमसी १९, राष्ट्रवादी ११, शिवसेना ८, डिएमके ६, बीजू जनता दल ६, आरजेडी ५, समाजवादी पक्ष ५, यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध राज्यातील १४ मंत्री, २६ खासदार, २१ आमदार, ५ माजी आमदार, अशी मोठी आकडेवारी आहे. यामध्ये एकही भाजप नेत्याचा समावेश नाही.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची कारवाई भाजपने थांबवली. यामध्ये हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, असे अनेक नावं आहेत. जेव्हा आमचे राज्य होते. तेव्हा राजकीय हेतूने कारवाई केली नाही. २००४ ते २०१४ फक्त काँग्रेस ४, टिएसी ७, डिएम के ४, भाजप ३, याचा अर्थ भाजपच्या फक्त ३ लोकांवर कारवाई केली. आता भाजपने १२१ लोकांवर कारवाई केली. सत्तेचा गैरवापर करुन यांनी राज्य चालवलं, असे शरद पवार म्हणाले. 

Sharad Pawar
Explosion in Transformer: पटणा सिव्हील कोर्टात ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट! एका वकिलाचा जागीच मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com