Ganesh Chowk park
sakal
नवीन नाशिक: सिडको परिसरातील गणेश चौक भागातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बालोद्यानाचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण करून लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. परंतु काही दिवसांतच या उद्यानाची दुरवस्था होऊ लागली आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर वाढला असून, सायंकाळनंतर नागरिकांसाठी येथे फिरणेही असुरक्षित झाले आहे.