नाशिक: लाडक्या श्री गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आतुर असलेल्या शहरातील गणेश मंडळांकडून जय्यत तयारी सुरू झाली असून, मंडळांकडून मंडप उभारणी केली जात आहे. पोलिस आयुक्तालय व महापालिका प्रशासनाने दिलेल्या नियमांनुसार मंडपाची उभारणी केली जात आहे.