Latest Marathi News | नाशिक : गणेश मंडळांना परवानगीसाठी करता येणार ऑनलाइन अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganeshotsav

नाशिक : गणेश मंडळांना परवानगीसाठी करता येणार ऑनलाइन अर्ज

जुने नाशिक : गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी महापालिकेने ऑनलाइन प्रणाली सुरू केली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. अर्ज करताना अर्जासोबत आधार कार्ड, हमीपत्र आणि जागेचा नकाशा जोडणे बंधनकारक आहे. महापालिकेतर्फे पडताळणी करून परवानगी दिली जाणार आहे. मंडळांनी तत्काळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले.


गणेश मंडळांची महापालिकेच्या मेनरोड येथील पूर्व विभाग कार्यालयात गुरुवार (ता. १८) दुपारी चारच्या सुमारास विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कोणत्याही मंडळाने विनापरवानगी उत्सव साजरा करू नये, तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. महापालिकेने दिलेल्या परवानगीचे पत्र मंडळाच्या सभा मंडपाच्या दर्शनी भागात लावावे. महसूल विभागाच्या पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या वेळी परवानगी पत्र लावलेले नसेल तर संबधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा: कोकण गणेशोत्सव : चाकरमान्यांसाठी आठ डब्यांची स्पेशल ट्रेन

मंडळांनी अखेरच्या दिवशी गर्दी न करता आताच प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन श्री. नेर यांनी केले. या वेळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे दत्ता पवार, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले, दिनकर कदम यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस महापालिकेचे अन्य विभागाचे अधिकारी, पोलिस कर्मचारी राजू जाधव, ललित केदारे, सतीश धनगर, अग्निशामक विभागाचे अधिकाऱ्यांसह गणेश मंडळाचे किरण खैरे, प्रसाद डोईफोडे, आदींसह मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट २३ गावातील मंडळांना घ्यावी लागणार गणेशोत्सव परवानगी

Web Title: Nashik Ganesh Mandals Can Apply Online For Permission For Ganeshotsav

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..