
संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : जागोजागी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, कुरकुऱ्याची रिकामी पाकिटे, विडी- सिगारेटची थोटके पडलेली. हे चित्र कुठल्या पडीक जागेचे नाही, तर ते आहे चक्क कॉर्पोरेट थाटाच्या येथील पंचायत समितीचे. गटविकास अधिकाऱ्यांच्या (बीडीओ) शासकीय वाहनात बिअरची बाटली, रिकामे ग्लास पडलेले. येथे तरुणांची मद्य पिण्यासाठी कायम बैठक. अधिकारी काही बोलल्यास मद्यपींकडून शिवीगाळ, दमदाटी केली जाते.